MH News Marathi
Hindi News Portal

डोंगरकीन्ही येथील महिलांना देह विक्री करावयास लावणारे आरोपी गजाआड

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव तालुक्यातील ग्राम डोंगरकीन्ही येथे प्रज्वल हॉटेलवर महिलांचा देह विक्रीचा व्ययसाय चालतो अशी गुप्त बातमी मिळाली.त्यावरून आज दिनांक 23/5/19 रोजी सदरील गुप्त माहितिचे आधारे मालेगाव मेहकर रोडवरील ग्राम डोंगरकीन्हीं येथिल प्रज्वल फॅमिली लॉज हॉटेल वर मा. उपविभागीय अधिकारी पवन बनसोड यांचे मार्गदर्शनात बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता सदरची बातमी खरी ठरल्याने सदरील हॉटेलवर महिला दक्षता समिती सदस्य प्रिया पाठक, व आशा रमेश पाठक व महिला पोलीस अधिकारी यांचे उपस्तितीत पोलीस रेड केली असता सदरचे प्रज्वल फॅमिली लॉज हॉटेलवर हॉटेल मालक प्रदीप उचित गवई रा.डोंगरकीन्ही हा अवैधपणे यवतमाळ येथील दोन महिला वय 30 वर्ष यांना देह विक्रीयचा व्ययसाय करविताना (कुंटन खाना चालविताना) मिळून आला. त्यावरून हॉटेल मालक प्रदीप उचित गवई यांचेवर महिलांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा कलम (PITA Act) 3,4,5 अन्वये कार्यवाही करण्यात आली. तसेच त्याच हॉटेल मध्ये गुटखा विक्री करताना व साठवणूक करतांना आणि दारू मिळून आल्याने त्याचेवर गुटखा भेसळयुक्त अन्नऔषधी प्रतिबंधक कायदा अंतर्गर कार्यवाही करिता जप्त केला असून पुढील कार्यवाही सूरु आहे. व अवैध दारू विक्री करताना मिळून आल्याने महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 इ अंतर्गत कार्यवाही सुरू आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358