MH News Marathi
Hindi News Portal

स्वपक्षातील असंतुस्ट नेते कुणाला रसद पुरविणार ? लोकसभा निवडणुकीचा ज्वर शिगेला

*राजेश दबडे*
मंगरुळपिर:-यवतमाळ-वाशीम लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.सर्वच पक्षाच्या उमेदवारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यासाठी राजकीय सरीपाटावर गोट्या सरकवीने सुरु केले आहे.मात्र विविध स्वपक्षातील असंतुस्ट नेते निवडणुकीत कुणाला रसद पुरवितात?याकडे सध्या जनतेचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणूकीची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी अनेक घडामोडी घडल्या होत्या.यावेळी काँग्रेस तर्फे उमेदवारी मिळावी म्हणून माणिकराव ठाकरे यांचे सह जीवन पाटील,हरिभाऊ राठोड,शिवाजीराव मोघे यांनी फिल्डिंग लावली होती.तर भाजपातर्फे पी बी आडे,मदन येरावार यांची नावे चर्चेत होती.शिवसेनेतर्फे भावना गवळी ह्या एकमेव उमेदवारीच्या स्पर्धेत होत्या.परंतु भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात येऊ नये असा सूर शिवसेना व भाजपातील काही नेत्यांनी पक्षश्रेष्टींकडे आवळला होता.सेना, भाजप युती झाल्याने व खा गवळी ह्या विध्यमान खासदार असल्याने मातोश्री वरून त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाली.यामुळे मात्र यवतमाळ जिल्ह्यातील काही सेना, भाजप नेत्यांसह वाशिम जिल्ह्यातील सुद्धा काही नेत्यांची नाराजी झाली.त्यामुळे निवडणूक लागल्यावर हे नेते वरवर जरी युतीचे काम करीत असले तरी त्यांच्या मनात काय सुरु आहे? याचा अंदाज लागत नाही.
तर काँग्रेसमध्येसुद्धा हीच स्थिती असून काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा थेट दिल्ली दरबारी गेल्यानंतर सर्वच इच्छुकांनी जोरदार लॉबिंग चालवली होती.यामध्ये माणिकराव ठाकरे यशस्वी झाल्याने त्यांना उमेदवारी मिळाली.परंतु यामुळे ईतर इच्छुक नाराज झाले.त्यामुळे युतीप्रमाणे आघाडीतसुद्धा स्वपक्षातील नाराज नेते आहेत.म्हणून सध्या जरी नाराज नेते शांत असले तरी त्यांची भूमिका काय राहील हा प्रश्न निर्माण होत आहे.राजकारणात कोणीच कुणाचा मित्रही नसतो व शत्रूही नसतो याप्रमाणे सेना, भाजप व काँग्रेस या पक्षातील असंतुष्ट नेते ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ” नुसार तर डावपेच खेळत नाही ना? अशा चर्चा राजकीय वर्तुळात असून प्रत्यक्ष निकालानंतरच ही बाब स्पष्ट होणार आहे.सध्या निवडणुकीला तीनच दिवस शिल्लक असून त्यामुळे सर्वच उमेदवार व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.

ट्रॅक्टर, हत्ती,शिट्टी,कपबशी सुद्धा रिंगणात !
या निवडणुकीत भाजपाचे बंडखोर उमेदवार पी बी हे सुद्धा शेतकऱ्याचा ट्रॅक्टर घेऊन निवडणूक लढवीत आहेत.तर प्रवीण पवार वंचित बहुजन आघाडीतर्फे तर वैशाली येडे प्रहार तर किनवटकर हे बसपातर्फे मैदानात आहेत.यापैकी वंचित आघाडी व अपक्ष आडे हे किती मते घेतात ही बाब सुद्धा महत्वाची आहे.यांच्या भूमिकेवरसुद्धा सेना, काँग्रेसचे जय,पराजयाचे गणित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358