MH News Marathi
Hindi News Portal

दानवेंची जीभ पुन्हा घसरली… पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले

खासदार रावसाहेब दानवे यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. सोलापुरातील भाजप-शिवसेना युतीच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना रावसाहेब दानवे यांनी भारतावर झालेल्या पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देताना जवानांऐवजी अतिरेकी असा उल्लेख केला.

दानवे म्हणाले की, ‘पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले. त्यामुळे देशात प्रचंड रोष तयार झाला.’ या वक्तव्यामुळे आता दानवे यांच्यावर सोशल माध्यमावर विरोधी पक्षासह अनेकांनी टीका केली आहे.

या वक्तव्यांचा राष्ट्रवादीने देखील समाचार घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358