MH News Marathi
Hindi News Portal

युवकांनो जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करा : नंदकिशोर वनस्कर

*युवकांनी शहिद दिनी रक्तदान करून वाहली श्रध्दांजली*

‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने नेहरू युवा केंद्र वाशीम व नेहरु युवा बहुउद्देशीय मंडळ मुंगळा यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद दिनानिमित्त २३ मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मुंगळा येथील श्री हनुमान मंदिर सभागृह येथे करण्यात आले होते.
भगत सिंग, राजगुरू, सुखदेव या महान क्रांतिकारकांना युवकांनी रक्तदान करुन श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. कोमल टार्फे, जनसंपर्क अधिकारी श्री सचिन दंडे, रक्तपेढी अधिकारी श्री एस. एन. फुके, ए. एल. सोळंके, श्री एल काळे, माधुरी व्यवहारे आदिंची उपस्थीती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते श्री वल्लभ पाठक, प्रविण वायकर, प्रमुख उपस्थितीत डाॅ. श्याम बिडवई, मेडिकल असोसिएशनच्या वतीने
सुरेश बेलोकर, सुखराम क्षीरसागर शाळा समिती अध्यक्ष गजानन साठे यांची उपस्थिती होती.
यावेळी नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर वनस्कर यांनी युवकांना मार्गदर्शन केले. की, रक्तदान करने ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा रुग्णांना वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे युवकांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन केले. शिबिरात जवळपास २७ च्या वर युवकांनी रक्तदान केले. सामान्य जनतेस हा मदतीचा हात मिळावा, या अनुषंगाने हा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतिकारी भगत सिंग, राजगुरू, सुखदेव या महान विरांच्या प्रतिमेचे विधिवत पुजन करुन हार अर्पण करण्यात आले.
यावेळी पांडुरंग राऊत, पुरूषोत्तम शर्मा, योगिराज मानोरकर विजय शर्मा, राम काटकर, अंकुश राऊत, रामेश्वर दौड, संतोष जाधव, अमोल सरोदे, कृष्णा क्षीरसागर, अभिजित हमाणे, मनोज वनस्कर, संतोष भांदुर्गे, गणेश क्षीरसागर, मंगेश मुळे, किशोर राऊत, राजेश कुटे, आतिश नखाते, अनिल राऊत, सचिन डोंबळे, दत्ता तहकीक आदि युवकांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ व स्वामी विवेकानंद युवा मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358