MH News Marathi
Hindi News Portal

महीलेकडून साडे आठ किलो गांजा जप्त

मंगरुळपीर :- पोलिसांनी तालुक्यातील चोरद फाटा येथून एका ३५ वर्षीय महीलेकडून साडे आठ किलो ओला गांजा किंमत ६७८२७ रुपये जप्त केल्याची घटना ता २७ चे सायंकाळी चोरद फाट्यावर घडली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार पक्षातर्फे फिर्यादी पोलीस निरीक्षक आर बी जायभाये यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह उपविभागीय पोलीस अधिकारी नंदा पाराजे यांचे मार्गदर्शनात चोरद फाटा येथे ता २७ रोजी धाड टाकली असता आरोपी महीला प्रमिला संजय इंगळे वय ३५ ,रा राजकिन्ही हिचेकडून एका नायलॉनच्या पिशवीत असलेला ८.४६३ कि ग्रॅ ओला गांजा किंमत ६७८२७ रुपये जप्त करून सदर महिलेला ताब्यात घेऊन एनडिपीएस ऍक्ट ८(ब),२० ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ता २८ रोजी सदर आरोपी महिलेस पीएसआय चंदनकुमार वानखडे यांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस १ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नंदा पाराजे ह्या करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358