MH News Marathi
Hindi News Portal

विनामुल्य दाढी कटींग करुन कोकाटे बंधुंनी केली मतदार जनजागृत

रिसोड – नगर परिषद निवडणूक काळात मतदानाच्या एक दिवस आधी 8 डिसेंबर रोजी येथील प्रतिक्षा जेन्टस पार्लरचे काशीनाथ व रामकृष्ण कोकाटे यांनी आपली आपली गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा जोपासत दुकानात आलेल्या ग्राहकांची मोफत दाढी कटींग करुन त्यांना मतदान करण्याविषयी आवाहन केले.
सुदृढ आणि सशक्त असलेल्या लोकशाहीला भरभक्कम करण्यासाठी मतदान करणे हे प्रत्येक नागरीकांचे प्रथम कर्तव्य असून प्रत्येक नागरीकाने मतदान केलेच पाहीजे. त्यातुनच सशक्त लोकशाहीचा खांब अधिक मजबुत होईल. या बाबीच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक विभागासह सरकार प्रत्यक्षपणे सक्रीय व सावध असून निवडणूक काळात तसेच इतरही वेळेमध्ये खाजगी तथा सरकारी अशा अनेक माध्यमातून मतदारांमध्ये मतदान जनजागृतीसाठी अग्रक्रम देत असतात. अनेक शाळा, महाविद्यालये, संघटना, संस्था यासह जागरुक नागरीक आपल्या परीने या राष्ट्रीय कार्याला हातभार लावतांना दिसत असतात. रिसोड शहरामध्येही काशीनाथ कोकाटे, रामकृष्ण कोकाटे हे युवक आपल्या सलुन (दाढी कटींग) या लघुव्यवसायाच्या माध्यमातून दुकानात आलेल्या ग्राहकाला दाढी कटींग करता करतात त्याच्याशी हितगुज करुन व त्याला बोलते करुन मतदानाविषयी त्याच्या मनातील विचार जाणून घेणे व मतदान करण्यासाठी सलून व्यवसाय माध्यमातून कोकाटे यांनी प्रत्यक्षपणे राष्ट्रीय कार्याला हातभार लावला आहे. या उपक्रमांतर्गत कोकाटे यांनी आपल्या दुकानात मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो अशा पध्दतीने मतदान जनजागृतीचे पोस्टर त्यांनी आपल्या दुकानात लावले असून दिवसभरात तब्बल 200 ते 250 ग्राहकांची दाढी कटींग करुन त्यांना संवादाच्या माध्यमातून मतदानासाठी कोकाटे बंधुंनी प्रोत्साहीत केले. त्यांच्या या उपक्रमाने अनेक जण प्रभावित होत आहेत. या उपक्रमामध्ये प्रतिक्षा जेन्ट्स पार्लरचे रामकृष्ण कोकाटे सह पवन राऊत, ऋषी कोकाटे, आकाश राऊत, ज्ञानेश्वर राऊत, हर्षल जाधव हे सहभागी झाले होते.
आत्मीक समाधानाची मिळते फलश्रुती – रामकृष्ण कोकाटे
शहर विकसीत करणारी यंत्रणा म्हणजे नगर परिषद असून नगर परिषदेचा विकास पर्यायाने शहराचा विकास करण्याकरीता मतदानामध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांमध्ये जागृती करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. अलीकडच्या काळात मतदानाचा टक्का सतत घसरत चालला असल्याचे दिसत आहे. ही बाब ध्यानात धरुन आम्ही हा उपक्रम गेल्या 2009 पासून राबवित आहोत. या उपक्रमातुन आम्हाला देशसेवा केल्याचे आत्मीक समाधान लाभत असल्याची प्रतिक्रिया रामकृष्ण कोकाटे यांनी यावेळी दिली.
कोकाटे यांचा उपक्रम कौतुकास्पद – मुख्याधिकारी पांडे
रामकृष्ण व काशीनाथ कोकाटे यांनी सुरु केलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असून या उपक्रमामुळे नागरीकांमध्ये मतदान जनजागृतीला चालना मिळत आहे. इतरांनीही त्यांच्या या उपक्रमापासुन प्रेरणा घ्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358