MH News Marathi
Hindi News Portal

पानकनेरगाव येथे भीम टायगर सेनेच्या वतीने रास्ता रोको…काही काळ तणावाचे वातावरण ..

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे १४/०१/२०१८ रोजी स्थापन करण्यात आली होती.व त्याच मध्यरात्री अ‍‌‌‌‍‍ज्ञात व्यक्तीने बँनर वर चिखल फेक केली व बँनरची नासधूस करण्यात आली.दुसर्या दिवशी म्हणजे १५/०१/२०१८ रोजी सकाळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले व भीम टायगर सेनेच्या वतीने तब्बल ३ तास रास्ता रोको करण्यात आला.समस्त भीम बांधवानि या प्रकारे त्यांनी घटनेचा निषेध व्यक्त केला. हि माहिती सेनगाव पोलीस स्टेशनला कळताच त्यांनी घटनेच्या स्थळी दाखल झाले व त्या घटनेचा पंचनामा करून जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले.व सदर घटनेचा पंचनामा स्वत: पी.एस.आय कारेगावकर यांनी केला व भीम टायगर सेनेच्या अध्यक्ष मोहन जीजीबा सुर्वे यांना लेखी आश्वासन दिले कि, आम्ही लवकरात लवकर सदर घटनेच्या आरोपीस अटक करून त्या वर कडक कार्यवाही करण्यात येईल.त्या नंतर वाहतूक सुरळीत आली.

प्रतिनिधी,दिगांबर क्षीरसागर
MH NEWS MARATHI
पानकनेरगाव

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358