MH News Marathi
Hindi News Portal

आध्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त वाशिम येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन.

वाशिम : येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा तर्फे पत्रकार दिनांनिमित्त व बाळशास्त्री जांभोकर यांच्या जयंती निमित्त वाशिम येथील फुले मार्केट मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या ठिकानी भव्य असे रक्तदान शिबीराचे आयोजन सुधा करण्यात आले होते.
तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील या होत्या.तर जेष्ट पत्रकार माधवराव अंभोरे ,मंगलदादा इंगोले,बाळासाहेब देशमुख,निलेश सोमानी,अभिजीत देशमुख,मुख्य अधिकारी शेट्टे,विनोद तायडे व सर्व पत्रकार बंधु उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पंकज गाडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश आढाव यांनी केल.

आज पत्रकार दिन ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या उत्तुंग कार्याला मानवंदना देण्याचा दिवस. 1832 साली याच दिवशी कै. बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते. त्यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया घातला म्हणून दरवर्षी 6 जानेवारीला पत्रकार दिन साजरा होतो. त्या अनुशंगाने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ वाशिम यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.