MH News Marathi
Hindi News Portal

मालेगावकरांनी सोशल मिडियातुन केले जातीय सलोख ठेवण्याचे आवाहन

*मालेगावकंरानी केलि उत्कृष्ट कामगिरी*

मालेगांव : गेले 4 दिवस सर्व महाराष्ट्र हिसाचारने ग्रस्त आसुंन यावर आवर घालताना मालेगावकंरानी सोशल मीडिया च्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी केलि.याची चर्चा सर्व मालेगांव मधे पाहायला मिळत आहे.
व्हॉटस्ॲप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल साइटवरून एक ना अनेक पोस्ट व्हायरल होत असल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यास अडचणी येत होत्या. त्यातच महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. बंद काळात अनुचित प्रकार घडल्यानंतर त्याच्या पोस्ट सोशल मीडियाद्वारे व्हायरल होणे स्वाभाविक होते. असे झाल्यास पुन्हा परिस्थिती नियंत्रणात आणणे पोलिसांना कठीण झाले असते. हीच बाब ओळखून पोलीस प्रशासनाने आवहान करुण अश्या पोस्ट न टाकन्याचे आवाहन केले होते याला सर्व मालेगांव येथील जनतेनी सहकार्य केले हिंसाचाराचे प्रकार रोखण्यासाठी मालेगावतील नागररिकांनी सोशल मीडियातून महत्त्वाची भूमिका पार पाडल्या गेली वाशिम जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटिल आणि मालेगांव स्टेशन चे पोलिस निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांनी ज्या पोस्ट टाकल्या याला सर्व मालेगांव करानी प्रतीसाद दिला असून कोणीही वाईट पोस्ट टाकल्या नाहीत.
राज्यभरात गेल्या तीन चार दिवसांपासून दुषित झालेले वातावरण व जातीय तेढ कमी करण्यासाठी बुधवारी सोशल मीडियातून अनेकांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मरण करून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला, तर अनेकांनी इंग्रजांची ‘तोडा आणि राज्य करा’ या नीतीची आठवण करून देत जातिभेद निर्माण करणार्यांचे आत्मभान जागविण्याचा प्रयत्न केला.
समाजात जातिभेद निर्माण करणार्यांचे आत्मभान जागविण्यासाठी बुधवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीची आठवण करून दिली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी जीवनभर जातिभेद व सामाजिक रूढी-परंपरांना झुगारून महिला शिक्षणासाठी प्रयत्न केले. वंचित व दुर्लक्षित घटकांपर्यंत शिक्षणाचा प्रवाह पोहोचविला. ज्यानी शाळा सुरु करण्यासाठी आपले जीवन वेचले त्यांच्या जयंतीला शाळा बंद ठेवल्या हे योग्य नसल्याचे मत मांडले म्हणून आपन सर्व जननी अश्या अप्रिय घटना टाळाव्या असे सांगितले सावित्री बाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशीच शाळा बंद असल्याची आठवण करून देत जातीय तेढ संपविण्याचे आवाहन अनेकांनी सोशल मीडियातून केले.
तर इंग्रजांनी भारतात जातिभेदाची बीजे पेरून सामाजिक तेढ निर्माण केली व तोडा व राज्य करा या नीतीने भारताला गुलाम बनविले. इंग्रजांनी केलेल्या जातीय भेदाभेदाच्या विषमय पेरणीचे परिणाम आजही देशाला भोगावे लागत आहेत. जातीय भेद व सामाजिक तेढ यामुळे कोणतीही जात विजयी होणार नाही, तर इंग्रज व त्यांची फोडाफोडीची रणनीतीच विजयी होईल, अशी जाणीव जातीय भेदाभेद पसरविणाºया समाजकंटकांना लगावली आहे. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाचा सर्वांनीच आदर करून एकदिलाने नांदण्याचे आवाहनही सोशल मीडियातून अनेकांनी केले आहे, तर काहींनी केवळ शांतता राखा आपण सर्व एक आहोत, असे आवाहन करणारे संदेश सोशल मीडियातून व्हायरल केले होते .

” ज्या पोस्ट मुळे समाजात टेढ़ निर्माण होतील अस्या पोस्ट आपन जाणीव पूर्वक टाळल्या पाहिजे या साठी कड़क कायदा आहे जे असे करतात त्याना शिक्षा होते पण या पोस्ट मुळे समजात कलह निर्माण होउ शकतो म्हणून आपन अस्या पोस्ट शिशल मीडिया वर टाकताना काळजी घ्यावी ”

*सुरेश नाईकनवरे पोलिस निरीक्षक मालेगांव*

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358