MH News Marathi
Hindi News Portal

*सलमान खान व शिल्पा शेट्टी वर कार्यवाई ची मागणी” मेहतर समाजाकडून मागणी*

*समाज बांधवांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन*

मंगरुळपिर: अभिनेता सलमान खान व अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी मेहतर समाजाविषयी अपशब्द काढल्याने त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी भाजपा नगर सेवक आकाश संगत यांचेसह मेहतर समाज बांधवांनी उपविभागीय अधिकारी यांना दि.24रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद आहे की,सिने अभिनेता सलमान खान व अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी एका वृत्तवाहिनीवर मुलाखत देतांना वाल्मिकी समाजाबाबत अपशब्द बोलून समाजाचा अनादर केला .यामुळे समाजात रोष व्यक्त होत असून याचा आम्ही तीव्र निषेध करतो.सलमान खान व शिल्पा शेट्टी यांनी अनुसूचित जाती कायदा 1989 चे उल्लंघन केले असून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली असून निवेदनावर कन्हैया टाकं, प्रकाश संगत, नगरसेवक आकाश संगत, राजेश संगत, कैलास टाकं, दीपक टाकं, दीपक संगत, गुरुचरन टाकं, शुभम बग्गन, चंद्रकांत सिरासीय, आकाश चारावंडे,राहुल डांगर, जयसिंग चारावंडे,अक्षय खरारे ,नरसिंग चरावंडे,राहुल डागर,हरीश टाकं, सुरज बग्गन,दिनेश चरावंडे,सुरज संगत, आदींच्या स्वाक्षरी आहेत.

*MH NEWS MARATHI*
मो.8788553077

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358