MH News Marathi
Hindi News Portal

*मालेगांव येथे वाचन विकास प्रशिक्षण उत्साहात : शिक्षकांचा उत्सुर्फ प्रतिसाद*

मालेगांव :- येथील अकोला रोड वरील आय एम ए हॉल येथे 20 डिसेम्बर पासून ते 22 डिसेम्बर पर्यन्त वाचन विकास प्रशिक्षण दररोज सकाळी 9:30 ते 5 या वेळेत आयोजित करण्यात आले होते ते अतिशय उत्साहात पार पडले .
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण विकास प्रशिक्षण तसेच व शिक्षा अभियान पंचायत समिती मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते शिक्षणामध्ये आनंददायी वाचन शिक्षण पूरक कृती विद्यार्थ्याच्या वाचनातील मागोवा घेऊन उत्कृष्ट श्रवण विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले त्यांच्या त्यांच्या भावविश्वातील अनुभव जर त्यांना दिले तर त्यांचे श्रवण वाचन मनन चिंतन अतिशय योग्य प्रकारे होते पर्यायाने भाषण संभाषण सुद्धा चांगल्या प्रकारे होते या प्रशिक्षणामध्ये वाचनाचे टप्पे शिकवताना कृतियुक्त अध्यापन करुन मार्गदर्शन करण्यात आले चित्र वाचन चित्र गाडी मैचिंग टेस्ट शब्द चक्र अक्षर गट वचन पाठ आदि अनुभव देण्यात आले कृतियुक्त गाणी बड़बड़ गीते चित्र शब्द वाचन आदि चे आनंद दायीं मार्गदर्शन करण्यात आले संपूर्ण राज्यात आतापर्यंत अनेक शाळा प्रकत झाल्या असून मात्र 100% मुलांची वाचन क्षमता विकसित झाली नाही ही क्षमता विकसित करण्यासाठी तसेच वाचन विकास टप्पे आणि त्यामागील विचार समजून घेऊन वाचनाचे क्षमता वाढण्यासाठी या राज्यव्यापी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षणमुळे प्रत्येक वर्गातील मुले वाचू शकतील हा यामागचा उद्देश होता या प्रशिक्षणात वाचन क्षमता चे टप्पे त्यामागील शिक्षकाची मार्गदर्शकचि भूमिका याबाबत संकल्पना स्पष्ट केल्या गेली.
प्रशिक्षकनाला जेष्ठ अधिव्याख्याता अरुन सांगोलकर अमोल डोंगाळे राजेश गवई क्रांति कुलकर्णी यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले याठिकाणी तज्ञ मार्गदर्शक म्हणून विषयतज्ञ भास्कर कोहळे मनोहर बाहे संदीप दसपुते बालाजी पाचपुते आदिनि मार्गदर्शन केले आहे
प्रशिक्षण समन्वयक म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस वाय पाटील राज्य समन्वयक नरेश नाखले किशोर वैष्णव तसेच प्रमुख नियंत्रक गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे यांनी सुद्धा भेट देऊन मार्गदर्शन केले आहे .

*MH NEWS MARATHI*
मो.8788553077

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358