MH News Marathi
Hindi News Portal

मराठा उपसमितीच्या बैठकीत मी नाराज होऊन निघून गेल्याचे वृत्त चुकीचे असल्याचा खुलासा महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे

मराठा उपसमितीच्या बैठकीत मी नाराज होऊन निघून गेल्याचे वृत्त चुकीचे असल्याचा खुलासा महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. नाराज होऊन नाही तर सदस्य नसल्यामुळे मराठा उपसमितीच्या बैठकीसाठी थांबले नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
मराठा आरक्षणाच्या उपसमितीच्या बैठकीत पंकजा मुंडे गेल्या होत्या. त्या बैठकीत सदस्य नसतानाही त्यांनी काही मुद्दे मांडले. हे मुद्दे समितीने स्वीकारले नाही म्हणून नाराज होऊन मुंडे समितीच्या बैठकीतून बाहेर पडल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांनी त्यांची नाराजी कळवली अशी बातमी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती. ही बातमी खोटी असल्याचा खुलासा खुद्द पंकजा मुंडे यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358