MH News Marathi
Hindi News Portal

मालेगाव येथे गोवर रूबेला लसीकरणची जनजागृती : चिमुकल्यांनी काढली रैेली

मालेगांव :- येथील ना.ना मुंदडा विद्यालयात मिजेल रूबेला लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये दोन हजार विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी तसेच आशा स्वयंसेविकांना सहभाग घेतला होता
रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी गोवर रूबेला लसीकरण साठी आवश्यक असलेले फ्लाक्स हातात घेऊन जनजागृती पहिली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली निघाली होती अकोला फ़ाट्या येथील ना.ना मुंदडा विद्यालयातून या रॅलीला सुरुवात झाली ही रॅली शहरातील मुख्य मार्गाने माळी वेटाळ खवले वेटाळ शिव चौक गांधी चौक मार्गे जोगदंड हॉस्पिटल समोरून पुन्हा विद्यालयात आली यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक घोषवाक्य म्हणून जनजागृती केली यात अहो काकू अहो काका लसीकरणाचा विचार करा पक्का , आजोबा आजी दया जरा लक्ष नातवाच्या लसीकरणासाठी तुम्ही दक्ष , एकच सुई आजाराला दूर नेई ,एक दिवस लसीकरणासाठी बाळाच्या उज्वल भविष्यासाठी , एक-दोन-तीन-चार गोवर रूबेला वर करू वार , लसीकरणाचा ध्यास धरू डिझेल रुबेलाचा नाश करून अशी घोषवाक्य विद्यार्थी म्हणत होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काढलेल्या रैलीला शहरात उत्तम प्रतिसाद मिळाला.यावेळी मुख्याध्यापक वसंतराव अवचार पर्यवेक्षक प्रा सावजी संजय साबळे गोविंद डाखोरे सुरेश डोंगरे राजेन्द्र गिरी अमोल कल्याणकर राजेश मोरे परमेश्वर नवाळे संजय पवार गणेश इन्नानी अतुल मिटकरी विलास गावंडे सचिन देवळे तर मलीता राठोड श्रद्धा देशमुख आकोडे ज्योति आकोडे अश्विनी बैस मंजुश्री खोंड जया घुगे माया ठाकरे आदि महिला शिक्षिका सह आरोग्य विभागाचे किरण जिरवणकर आशा सेविका आणि इतर कर्मचारी उपस्थित होते य्यावेळी रैली संपल्यावर नंतर ड़ॉ संतीश घुगे यांनी या विषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358