MH News Marathi
Hindi News Portal

मंगरुळपिर येथे मूलभूत सुविधा व जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करण्याच्या मागण्यासह अन्य मागण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने ता२६ नौव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ।

मंगरुळपिर येथे मूलभूत सुविधा व जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करण्याच्या मागण्यासह अन्य मागण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने ता२६ नौव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच तहसीलदार सभेस बाहेरगावी गेल्याने आंदोलनकर्त्यांनी खुर्चीस निवेदन दिले.
वाशीम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करावा,शेतकरी,शेतमजुरांना दिर्घ मुदतीचे कर्ज द्यावे,शहरातील झोपडपट्टी धारकांना कायमस्वरूपी पट्टे द्यावे,संजय गांधी योजनेचे अनुदान वाढवावे,ग्रामीण रुग्णालयात सुविधा द्याव्या,शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यात यावा,अतिक्रमण धारकांना पर्यायी जागा द्याव्या,वीज दर निम्मे कमी करावे,बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा,पालिका क्षेत्रात सुविधा पुरवाव्या,सर्व शाळांमध्ये सिबीएससी अभ्यासक्रम मोफत शिकवावा आदी मागण्यासाठी ता २६ रोजी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.आंदोलनात लेफ्टनंट कमांडर डॉ अलीम पटेल,वसंत ढोके, गजानन अमदाबादकर,किरण गुढडे, मुजीब खान, यांचेसह अनेक महिला व पुरुष सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.