MH News Marathi
Hindi News Portal

मंगरुळपीर येथे दिनांक २६ नोव्हेंबर रोजी देशातील पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांची जयंती ता २५ रोजी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने साजरी करण्यात आली.

मंगरुळपीर :

येथे दिनांक २६ नोव्हेंबर रोजी देशातील पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांची जयंती ता २५ रोजी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने तुकडोजी महाराज प्रार्थना सभागृहात साजरी करण्यात आली.या निमित्य महिला डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ जया फुके होत्या तर डॉ अर्चना चव्हाण,डॉ सुनीता गट्टानी,डॉ प्रज्ञा मुळे, डॉ चैताली फुसे, माजी नगरसेविका रेखाताई गावंडे,जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षा रोशनी दबडे,सचिव दिपलक्ष्मी येवले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.देशात सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत असून त्यांची नोंद इतिहासाने घेतली तसेच त्यांच्या जयंती निमित्य त्यांचे कार्य समजावे म्हणून सदर कार्यक्रम आयोजित करण्यात येऊन महिला डॉक्टरांचा सत्कार करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावेळी बोलतांना डॉ जया फुके म्हणाल्या की,जिजाऊ ब्रिगेडने महिलांच्या आरोग्याबाबत कार्यक्रम आयोजित करून संघटनेचे कार्य ग्रामीण भागातसुद्धा करावे.तर भविष्यात आरोग्यविषयक कार्यक्रमात पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन डॉ अर्चना चव्हाण व डॉ सुनीता गट्टानी यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन शितल चव्हाण यांनी केले.प्रास्ताविक रोशनी दबडे तर आभार दिपलक्ष्मी येवले यांनी मानले.यावेळी मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष गोपाल गावंडे,नगरसेवक आकाश संगत,प्रा प्रल्हाद गावंडे, गजानन निचळ,शरद येवले,राजेश दबडे,दिपक राठोड,प्रशांत गावंडे, यांचेसह चेतना गावंडे,जया ठाकरे,अपर्णा ठाकरे,ललिता चौधरी,पूजा चव्हाण आदींची उपस्थिती होती

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358