MH News Marathi
Hindi News Portal

शेकडो मुस्लिमांनी अयोध्या सोडली , शिवसेना व विश्व हिंदू परिषदेच्या रॅली मुळे तणाव।

अयोध्या :

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काही हजार शिवसैनिकांसह रविवारी (25 नोव्हेंबर)अयोध्या दौरा करणार आहेत. याचदिवशी विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसंसदेमुळे धडक कृती दल  (आरएएफ) आणि दहशतवादविरोधी पथकं अयोध्येत तैनात करुन सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे, विश्व हिंदू परिषदेची धर्मसंसद आणि शिवसेनेच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील मुस्लिम नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, येथे प्रचंड तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यानं लोकांनी घरामध्ये अन्नधान्य भरण्यास सुरुवात केली आहे. अयोध्येत डिसेंबर 1992 मध्ये मशीद पाडल्यानंतर देशभर जे प्रकार घडते, त्यामुळे स्थानिक लोक चिंतित आहेत. असे काही घडू नये, अशीच त्यांची इच्छा आहे. 

भीतीपोटी जवळपास 3,500 मुस्लिमांनी शहर सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून 24-25 नोव्हेंबरच्या राजकीय कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 
फैजाबादचे पोलीस अधीक्षक अनिल कुमार सिंह यांनी आश्वासन दिले आहे की, मुस्लिम नागरिकांना पूर्णतः सुरक्षा पुरवण्यात येईल. कोणीही घाबरुन जाण्याचे कारण नाही. यादरम्यान, अयोध्येत धर्म संसदेची जोरदार तयारी सुरू आहे.  विहिंपचे  1 लाखहून अधिक कार्यकर्ते कार्यक्रमासाठी हजर राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358