MH News Marathi
Hindi News Portal

मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा बाण, केजरीवालांवरील हल्ल्यानंतर ‘सामना’ रंगला,

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या मिरची पूड हल्ल्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची सुरक्षा हे दिल्ली पोलिसांचेच काम आहे व दिल्ली पोलिसांचे नियंत्रण केंद्र सरकारकडे आहे. त्यामुळे संशयाला जागा आहे, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

शिवाय, गेल्या चार वर्षांत दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी जाहीर थपडा खूप खाल्ल्या, पण त्यांच्या चिकाटीचे कौतुक करावे लागेल. राजकारणात शाईफेक, चप्पलफेक, मिरचीपूड फेकीस प्रतिष्ठा मिळत आहे. हा लोकांचा संताप असेल तर थापेबाजी, जुमलेबाजी, महागाई, भ्रष्टाचार व देश विकणाऱ्या सौद्यांच्या विरोधात या संतापाच्या ठिणग्या का उडत नाहीत?, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358