MH News Marathi
Hindi News Portal

प्रत्यक्षात मंदिर कधी उभारणार, आणखी किती दिवस लोकांना मूर्ख बनवणार?, अयोध्या दौरा राजकारणासाठी नाही: उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे हे २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या दौरा करणार आहेत. या दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे शिवनेरी गडावरील मातीचा कलश घेऊन जाणार आहेत. यासाठीच उद्धव ठाकरे गुरुवारी शिवनेरी गडावर पोहोचले. शिवनेरी गडावर शिवसैनिकांनी उत्साहात त्यांचे स्वागत केले. यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवरायांचे दर्शन घेतले. उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. ‘मी अयोध्येला राजकारणासाठी जात नाही. निवडणूक आला की राम मंदिराचा मुद्दा पुढे येतो. प्रत्यक्षात मंदिर कधी उभारणार, आणखी किती दिवस लोकांना मूर्ख बनवणार?’, असा सवाल त्यांनी सत्ताधारी भाजपाला विचारला.

अयोध्येत उद्धव ठाकरे शिवनेरी गडावरील मातीचा कलश नेणार आहे. यावरही उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. ‘ही गडावरची केवळ माती नाही तर शिवभक्तांच्या भावना आहेत’,अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.उद्धव ठाकरे आणि विश्व हिंदू परिषदेच्या अयोध्येतील कार्यक्रमावर महंत नरेंद्र गिरी यांनी बुधवारी टीका केली होती. या नेत्यांना रामापेक्षा राजकारणात अधिक रस आहे. या दोन्ही संघटना (शिवसेना- विश्व हिंदू परिषद) स्वत:चा प्रचार आणि राजकारणासाठी अयोध्येत कार्यक्रम करत आहे, असा आरोप नरेंद्र गिरी यांनी केला होता

अयोध्या दौऱ्यावरुन टीका करणारे आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी राजकारणासाठी अयोध्येत जात नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.