MH News Marathi
Hindi News Portal

4 षटकांत जिंकला सामना

शारजाह :

T-10 च्या दुसऱ्या सत्रातील पहिल्याच दिवशी धुव्वाधार अशा खेळीचा आस्वाद घेता आला, याचा क्रिकेट चाहत्यांना आनंद झाला. अफगाणिस्तानचा स्फोटक फलंदाज  मोहम्मद  शहजादने 16 चेंडूंत 74 धावा करताना राजपूत संघाला दहा विकेट राखून विजय मिळवून दिला. त्याने 74 धावांच्या खेळीत आठ उत्तुंग षटकार आणि 6 चौकारांची आतषबाजी केली. त्याने अवघ्या 12 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. सिंधी संघाने सलामीच्या सामन्यात 10 षटकांत 6 बाद 94 धावा केल्या. कर्णधार शेन वॉटसनने 20 चेंडूंत 42 धावांची खेळी साकारली. त्यात 3 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता.  

94 धावा उभ्या केल्यानंतर सिंधी संघाने मोहिम फत्ते असल्याचे समजले, परंतु शहजादने त्यांच्या विजयाच्या स्वप्नांवर पाणी फिरवले. त्याने पहिल्याच षटकात तीन चौकार व एक षटकार खेचून एकूण 20 धावा केल्या. पुढच्या षटकार राजपूतचा कर्णधार ब्रेंडन मॅकलम् याने बॅटवर हात मोकळे केले. तिसऱ्या षटकात शहजादने श्रीलंकेच्या थिसारा परेराच्या गोलंदाजीवर 30 धावा केल्या त्यात त्याने  तीन षटकार व 3 चौकार खेचले. त्यानंतर शहजादने चौथ्या षटकात सामना संपवला. मॅकलमने 8 चेंडूंत 21 धावा केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358