MH News Marathi
Hindi News Portal

मोदी : काँग्रेसही राहुल गांधींची दखल घेत नाही

मध्यप्रदेशमध्ये २८ नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपच्या गडाला सुरूंग लावण्यासाठी काँग्रेस सर्व शक्ती लावून प्रयत्न करते आहे. तर दुसरीकडे खुद्द पंतप्रधान मोदी भाजपसाठी महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये प्रचार करत आहेत. रविवारी इंदोरमध्ये प्रचार करताना त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर आगपाखड केली.’ राहुल गांधींची दखल काँग्रेसमध्येच कोणी घेत नाही. मेक इन इंदोर, मेक इन छिंदवाडाच्या किती घोषणा गांधींनी दिल्या. पण काँग्रेसच्या घोषणापत्रात या घोषणांचा नाममात्र उल्लेख देखील नाही. जर काँग्रेस पक्षातच कोणी त्यांना महत्त्व देत नसेल तर देश काय देईल’ असा सवालच मोदींनी केला. त्याचवेळी राहुल गांधींच्या अज्ञानाचीही मोदींनी खिल्ली उडवली.

राहुल गांधींना एनसीसी काय कळत नाही, घोषणापत्र उमजत नाही त्यांना देश काय कळणार आणि संस्कृती काय उमजणार असा टोलाही मोदींनी लगावला.
राहुल गांधींवर टीका करतानाच मोदी भाजपच्या कामांची स्तुती करायला विसरले नाहीत. चहावाल्याच्या सरकारने मध्यप्रदेशात १००हून अधिक मोबाइल कारखाने उभारत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली असा दावा त्यांनी केला. मध्यप्रदेश सरकारच्या योजनांचंही यावेळी त्यांनी तोंड भरून कौतुक केलं.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना त्यांच्या पक्षातच कोणी महत्त्व देत नाही तर सामान्य जनता तरी काय महत्त्व देणार असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला आहे. मध्यप्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंदोरमध्ये घेतलेल्या प्रचारसभेत त्यांनी राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358