MH News Marathi
Hindi News Portal

धक्कादायक। अजमल कसाब भारतीय होता उत्तरप्रदेशमध्ये दिले निवासी प्रमाणपत्र

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील एकमेव हाती लागलेला दहशतवादी अजमल कसाब हा पाकिस्तानी नव्हता, तर तो भारतीय रहिवासी होता. उत्तर प्रदेश प्रशासनाने कसाबच्या जातीचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्र जारी केल्याने खळबळ माजली आहे. यानंतर त्वरित सावरत हे प्रमाणपत्र जारी करणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे.

बिधुना तहसील कार्यालयात हा प्रकार उघडकीस आला आहे. तेथील आंबेडकर गावातील एका व्यक्तीने ऑनलाईन पद्धतीने अजमल कसाबच्या जातीच्या आणि रहिवासी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. या प्रमाणपत्रामध्ये कसाबचे जन्मगाव आंबेडकर नगर असे नोंद आहे. तर हे प्रमाणपत्र 21 ऑक्टोबर, 2018 मध्ये जारी करण्यात आले होते.

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना कसाबचा फोटोही लावण्यात आला होता. तरीही हे प्रमाणपत्र देताना अधिकारी आणि कर्मचारी त्याला ओळखू शकले नाहीत. तसेच प्रमाणपत्र देतानाही पडताळणी करण्यात आली नाही. अर्जामध्ये कसाबच्या वडिलांचे नाव मोहम्मद आमिर तर आईचे नाव मुमताज बेगम देण्यात आले होते. 

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358