MH News Marathi
Hindi News Portal

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मंजूर…

तुषार मांडे, :- आताची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मंजूर कऱण्यात आला आहे. भुजबळांना २ वर्षानंतर जामीन मंजूर झाला आहे, छगन भुजबळ यांचा बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी १४ मार्च २०१६ पासून – २ वर्षापासून मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये मुक्काम होता. छगन भुजबळ तरूंगात असताना राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी देखील त्यांची भेट घेतली होती. छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. अनेक दिवसापासून छगन भुजबळ यांनी जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र सतत त्यांना जामीन नाकारला जात होता, छगन भुजबळ यांची प्रकृती तुरूंगात सतत ढासळत असल्याची तक्रार देखील होत होती. छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे. छगन भुजबळ हे आज जेलची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाहेर येऊ शकतील. १४ मार्च २०१६ पासून छगन भुजबळ तुरूंगात आहेत.

छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मनी लॉन्डिंग प्रकरणी छगन भुजबळ तुरूंगात होते, नाशिक आणि येवल्यात छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर जल्लोष सुरू झाला आहे.

तुषार मांडे पाटिल
मुख्य संपादक
MH News मराठी

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358