MH News Marathi
Hindi News Portal

मालेगावात बुद्ध पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रम

तुषार मांडे:-मालेगांव :- तथागताच्यां विचाराने या जगात समतामुलक  आचरणाने मानवाला दुःख मुक्तीचा मार्ग म्हणजे मध्यम मार्ग दिला. त्यामुळेच जगात शांती नांदत आहे आणि आज स्पर्धेच्या जगात खरोखर बुध्दाची गरज आहे.  बुध्द विचाराच्या प्रचार व प्रसाराने ती उणीव भरून काढता येईल असे प्रतीपादन आबेंडकरवादी नेते बबनराव बनसोड यांनी धम्मस्थान स्तूप येथे बुद्ध पौर्णीमेच्या कार्यक्रमात केले. 

    तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अरविंद पखाले तर प्रमुख पाहूणे म्हणून समाधान गुडदे, जेष्ठ बौद्धाचार्य पुंडलीक पखाले व दिपक घुगे,प्रकाश भारसागळे हे हजर होते. प्रारंभी मान्यवरांनी तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमांची धूप-दिप-पुष्पाने व पुष्पहाराने पूजन केले तर बौद्धाचार्यानी त्रिशरण-पंचशील व पुजापाठ घेतला.

      या कार्यक्रमचे प्रास्ताविक बौध्द स्तूपाचे मुख्य प्रवर्तक सुधाकर पखाले यानी केले मालेगांव शहराची एक ओळख ( लँण्डमार्क)  म्हणून गुगलमँपने नोंद घेवून शहराच्या नकाशात नोंद घेतल्या बद्दल त्यानी गुगलचे आभार मानले.  वैशाख पौर्णीमा बुद्ध जयन्ती निमीत्य स्तूप परीसर पंचरंगी पताका लावून सजविण्यात आला होता.  

कार्यक्रमाचे संचलन सुरेश सावळे यांनी तर आभार प्रदर्शन चांगदेव पखाले यांनी केले.  कार्यक्रमाला बौद्धधर्मी उपासक- उपासीका आणि बालंकांची उपस्थिति होती.  शहरातील पंचशील व तक्षशीला विहारातही पंचरंगी धम्मरश्मी धम्मध्वज फडकवून, पुजापाठ व खिरदानाचे कार्यक्रम उत्साहात घेण्यात आले.

तुषार मांडे पाटिल
मुख्य संपादक
MH News मराठी

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358