MH News Marathi
Hindi News Portal

दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली इंग्रजी शाळेत फी वाढ

मालेगाव :- स्पर्धेच्या युगामध्ये इंग्रजी शाळेचे पीक आले असून, दर्जेदार शिक्षण देण्याच्या नावाखाली खाजगी शिक्षण संस्थेकडून दरवर्षीच शाळेच्या फीमध्ये वाढ करीत आहे. संस्थाचालकांकडून मनमानी पद्धतीने फी वाढ करून पालकांची लूट चालविली आहे. यामुळे पालकांच्या खिशाला कात्री लावल्याने खाजगी संस्थाचालकाचे अच्छे दिन आले आहे असून, पालकाना बुरे दिन सोसावे लागत असल्याचे चित्र तालुक्यात बघायला मिळत आहे.
आता शहर व ग्रामीण भागात इंग्लिश मीडियम कॉन्व्हेंट सुरू करण्याची स्पर्धा लागली आहे. पूर्वी कमी प्रमाणात असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गर्भश्रीमंतांची मुले शिकायची. तर सर्वसामान्य कुटुंबातील मुले जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होती. त्यामुळे वर्गामध्ये विद्यार्थ्यांना बसायला जागा राहत नव्हती. मात्र, १० वषांर्च्या कालखंडातच ही परिस्थिती उलट झाली आहे. शहरात नवनवीन प्रयोग करून उत्तम शिक्षण मिळवून देण्याची किमया साधून अनेकानी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या. यामुळे शहरात असणाऱ्या प्रत्येक पालकांना वाटते की, आपल्या पाल्याला उत्तम शिक्षण मिळावे. त्यामुळे पालकांचा कल आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे वळला असून, आपल्या पाल्यांचा इंग्रजी शाळेत प्रवेश निश्चित करीत आहे. .
त्यामुळे इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील शहरात नर्सरीपासून शिक्षण घेण्यासाठी येत आहे. या सर्व बाबी संस्थाचालकांनी हेरून आपल्या मनमानी पद्धतीने कारभार चालवायला सुरुवात केली. वारेमाप फी आकारून शिक्षणाचा जणू बाजार मांडण्याचा प्रकार या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. या प्रकाराची माहिती शिक्षण विभागाला असूनही अर्थपूर्ण हितसंबंधातून अधिकारी दुर्लक्ष करीत आहे.शहरातील काही प्रख्यात संस्थाचालकांनी तर शाळेच्या गेटवर अडवून पालकांकडून शाळेची फी भरा अन्यथा, पाल्याना शाळेत बसू देण्यात येणार नसल्याची धमकी देण्याचा प्रकार सुरू आहे. कुणी पालकांनी आवाज उठवला तरी त्याला धमकावून वाटी लावण्यात येते. खाजगी संस्थाचालक फीसाठी विद्यार्थ्यांना त्रस्त करीत असल्याने शाळेत जाण्याची इच्छा देखील विद्यार्थी करीत नाही. हा सर्व प्रकार सर्वांच्या डोळे देखत घडत असला तरी कोणत्या राजकीय पुढारी हा गंभीर प्रश्न उचलायला पुढे येत नाही. मग न्याय मागायचा तरी कुणाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वारेमाप फी आकारणाऱ्या संस्थेच्या चालकांवर कडक कारवाही करावी, अशी मागणी पालक वर्ग करीत आहेत.

इनबॉक्स
जाणीव हरवली
इंग्रजी शाळाना मान्यता शासनाने दिली आहे यावर जी प च्या अधिकारी वर्गाचे यावर नियंत्रण आहे मात्र याची जानीवच या अधिकारी वर्गणा उरली नाहि ती जाणीव जागि होने अपेक्षित आहे.

आनुदानित शाळेतिल शिक्षक ठरत आहेत अतिरिक्त..
एकीकडे भरमसाठ शाळा ना परवनगी दिल्या जात आहेत त्यामुळे आनुदानित शाळेतिल विद्यार्थी कमी होत जात आहेत त्यामुळे अनुदानित शळेेतिल शिक्षक ठरत आहेत अतिरिक्त यावर अंकुश लागने गरजेचे आहे.

तुषार मांडे पाटिल
मुख्य संपादक
MH News मराठी

Leave A Reply

Your email address will not be published.