MH News Marathi
Hindi News Portal

शिरपूर जैन येथील रस्ते राहतात यात्रेकरूंच्या कायम स्मरणात….

गोपाल वाढे,प्रतिनिधी/शिरपूर :

शिरपूर जैन हे पर्यटन स्थळ आहे. व येथे देशभरातून पर्यटकांची गर्दी होत असते. पर्यटना निमित्त आलेल्या पर्यटकांना गावातील खड्डे असलेल्या रस्त्यांची माहिती नसल्यामुळे पर्यटकांची फजिती होते.

शिरपूर जैन हे ऐतिहासिक वारसा लाभलेले गांव आहे. त्याच बरोबर आजू बाजूला असलेल्या तब्बल ३५ ते ४० गावांची मुख्य बाजारपेठ आहे. जैनांची काशी,परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान जानगीर महाराज संस्थान,मुस्लीम धर्मीयांचे देवस्थान हजरत मिर्झा मिया देवस्थान,हिंदू -मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या या शिरपूर गावाचा राजकीय अनास्थेमुळे विकास झाला नाही. गावात राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम झालेले आहे त्यामध्ये कंत्राटदाराने पाईप लाईन केल्यानंतर खोदकाम मातीनेच बुजवल्यामुळे रस्त्यांवर मधोमध ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.

गावातील अनेक मंडळींनी राजकारणातील अनेक मोठी पदे उपभोगली आहेत.परंतु अत्यंत खालच्या पातळीवरील राजकारण करून गावाचा विकास मात्र होऊ दिला नाही,केला नाही.गावाचे ऐतिहासिक महत्व, परिसरातील गावांची मुख्य बाजारपेठ त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना तसेच पर्यटकांना विविध समस्येला सामोरे जावे लागते. त्यातच स्थानिक प्रशासन एवढे सुस्त झालेले आहे की मुद्दामहून झोपेचे सोंग घेऊन बसले आहे हा प्रश्न गावकऱ्यांसह पर्यटकांना देखील भेडसावत आहे.

गोपाल वाढे,प्रतिनीधी
MH News मराठी
शिरपुर जैन

Leave A Reply

Your email address will not be published.