MH News Marathi
Hindi News Portal

तहसिल कार्यालयाद्वारे पेट्रोल पंपाची तपासनी

मालेगांव :- तालुका दक्षता समितीच्या सभेमध्ये समितीचे अध्यक्ष. आमदार अमित झनक तसेच दक्षता समितीच्या सदस्यानी दिलेल्या सूचना नुसार मालेगावचे तहसीलदार राजेश वजिरे यांनी आज मालेगाव मधिल काही पेट्रोल पंप अशी अचानक तपासणी केली
यामध्ये मालेगाव शहरातील शाम ऑटोमोबाईल्स अकोला फाटा जगदंबा पेट्रोल पंप शेलृफेटा मॉ शाकंबरी ऑटोमोबाईल्स बायपासरोड व साई पेट्रोलियम बायपास रोड नागरदास या पेट्रोल पंप यांना भेट देऊन तेथील हायड्रो मिटर रीडिंग तापमान साठा तपशील आवाक विक्री शिल्लक साठा तसेच अग्निशमन व्यवस्था तसेच हवा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था भाव फलक व साठा व्हिजिटवर तक्रार पुस्तक विक्री रजिस्टर डेन्सिटी रजिस्टर मोजणी करता मापे पुरुष व महिलांकरिता स्वतंत्र मुत्री घराची व्यवस्था इत्यादी बाबी तपासून पेट्रोल पंप चालकांना आवश्यक त्या सूचना दिल्या असून सदर तपासणी अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी वाशिम यांच्याकडे आवश्यक कारवाई करिता पाठविण्यात येणार आहे तसेच तालुक्यातील उर्वरित इतर पेट्रोल पंपाची सुद्धा लवकरच तपासणी करण्यात येणार असल्याचे तहसीलदार राजेश वगैरे यांनी सांगितले सदर तपासणीच्या वेळी पुरवठा निरीक्षक रवी राऊत व नीलेश राठोड उपस्थित होते .

इनबॉक्स

तपासणी नियमित व्हावी
मालेगाव तहसील कार्यालय द्वारे आज जी तपासणी झली ति नियंमित व्हावी अशी मागणी नागरिकनतर्फे करण्यात येत आहे अनेक पेट्रोल पम्प वर पारदर्शक पाइप नाही तर अनेक ठिकाणी मिटर सेट केल्या जात नाही तर अनेक ठिकाणी हवा तसेच महिला आणि पुरुषंसाठी मुत्री घरची व्यवस्था नाही तर काही पेट्रोल पम्प वरील पेट्रोल चा दर्जा नाही यावर तहसील कार्यालयाने आक्षेप घ्यावा आणि तपासणी नियंमित करावी अशी मागणी नागरिकांची आहे.

तुषार मांडे,मुख्यसंपादक

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358