MH News Marathi
Hindi News Portal

प्रसिद्ध उद्योगपती श्री. ब्रिजलाल खुराणा यांचे निधन ; उद्या सकाळी अकरा वाजता क्याधू तिरावर अत्यसंस्कार

हिंगोली/- येथील प्रसिद्ध उद्योगपती श्री. ब्रिजलाल टेहलाराम खूराणा ( वय-84) यांचे औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हाॅस्पीटल मध्ये उपचार घेत असताना मंगळवार दि. 13 मार्च रोजी मध्य रात्री 2;30 वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
हिंगोली येथील प्रसिद्ध उद्योगपती तथा व्यावसायिक श्री. ब्रिजलाल खुराणा (वय 84) हे गेल्या दिड महिन्याभरापासून आजारी होते. परंतु गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती पून्हा नाजूक बनल्यामुळे त्यांना हिंगोली येथून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हाॅस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले. रूग्णालयात उपचार सुरू असताना श्री. ब्रिजलाल खूराणा यांची प्राणज्योत मंगळवार दि.13 मार्च रोजी मध्यरात्री 2:30 वाजता माळवली. श्री. ब्रिजलाल खुराणा यांच्या पश्चात श्री.राणा तिलकराज खुराणा, श्री. जनकराज खुराणा, श्री. ललितराज खुराणा, श्री. जगजितराज खुराणा, हंसराज खुराणा हे पाच मुले तर मुलगी मंजूबाई गुल्हाटी आहेत. नातू पणतू असा मोठा परिवार आहे. श्री. ब्रिजलाल खुराणा यांच्यावर उद्या बुधवार दि. 14 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता हिंगोली येथील क्याधू तिरावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
श्री. ब्रिजलाल खुराणा यांनी अतिशय परिश्रम घेऊन उद्योग व्यवसायाची उभारणी केली. खुराणा ट्रान्स्पोर्ट, खुराणा ट्रॅव्हल्स, खुराणा पेट्रोलियम, खुराणा आॅईल फॅक्टरी, खुराणा जिनींग, संत नामदेव पतसंस्था आदीसह अनेक उद्योग त्यांनी उभारून हजारो कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला. यासह त्यांनी हिंगोली येथे डेंटल काॅलेज, इंजिनियरींग कॉलेज उभारून शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले. भाजपचे ते वरिष्ठ नेते होते. अनेक राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. हिंगोलीचे नांव त्यांनी आपल्या उद्योग व्यवसायातून देश पातळीवर पोहचविले आहे. सामाजिक, शैक्षणिक यासह विविध क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे.
त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

प्रतिनिधी,राजु मगर
MH NEWS मराठी हिंगोली

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358