MH News Marathi
Hindi News Portal

अवघ्या १२ तासाच्या आत मोबाइल चोर जेरबंद

प्रतिनिधी/शिरपूर : शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बेलखेडा फाटयावर एका अनोळखी इसमाने मोटारसायकल थांबवून, चाकुचा धाक दाखवून ३२ हजार रुपये किंमतीचा मोबाईल पळविल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी रात्री दरम्यान घडली. यासंदर्भात १ मार्च रोजी जोंधनखेडा ता.मुक्ताईनगर जि. जळगाव येथील मुक्तार दिलावर पठाण यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन स.पो.नि. शिपणे व त्यांच्या टीमने ताबडतोब तपास करुन या प्रकरणातील आरोपी सुमेध अशोक सावळे रा. पार्डी तिखे यास पोलीसांनी अवघ्या १२ तासात मोबाईलसह ताब्यात घेतले.

पोलीस स्टेशन शिरपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुक्तार दिलावर पठाण मोटारसायकलवर ग्राम भगवती ता. सेनगाव येथून देवूळगाव साखरशा येथे जात असतांना बेलखेड फाटयावर एका अनोळखी इसमाने चाकुचा धाक दाखवून मोबाईल हिसकावून घेतला. पठाण यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता चाकू हातावर मारण्याचा प्रयत्न केला. तो वार वाचवितांना मोटारसायकलचे ५०० रुपयाचे नुकसान झाल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरुन स.पो.नि. शिपणे व त्यांच्या टीमने ताबडतोब तपास करुन या प्रकरणातील आरोपी सुमेध अशोक सावळे रा. पार्डी तिखे यास पोलीसांनी अवघ्या १२ तासात मोबाईलसह ताब्यात घेतले.याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार अ.प.क्र ३३/१८ कलम ३९२, ३४१, ४२७ भादं.वी. नुसार गुन्हा दाखल केला आहे. व आरोपीस रिसोड येथील न्यायालयात हजर केले असल्याची माहिती बातमी लिहिस्तोवर हाती आली आहे.

गोपाल वाढे,प्रतिनिधी
MH News मराठी
शिरपुर जैन

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358