MH News Marathi
Hindi News Portal

मालेगाव तालुका तेली समाजाचे वतीने तहसीलदारांना निवेदन

मालेगाव:- दोंडाईच्या शहरात पाच वर्षाच्या बालिकेवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची चौकशी करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी संपूर्ण मालेगांव तालुका तेलि समाजाच्यावतीने दिनांक 22 ला तहसीलदारांना नीवेदन देऊन केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरातील ज्ञानोपासक संस्थेच्या नूतन माध्यमिक विद्यालयात पाच वर्षाच्या बालिकेवर दिनांक 8 फेब्रुवारी रोजी रोजी पाशवी बलात्कार करण्यात आला त्या प्रकरणी जळगाव पोलीस स्टेशन मध्ये पीडितेचे आई-वडिलांनी दोशी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे व जळगाव सिव्हिल हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणी व उपचाराकरिता दाखल करण्यात आलेले आहे तेली समाजाच्या बालिकेवर झालेला हा अन्याय संपूर्ण भारतातील तेली समाजाने खपून घ्यायचा का आम्ही संपूर्ण मालेगाव तालुक्यातील तेली समाज बांधव व भगिनी घडलेल्या प्रकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो आमचा लढा हा एखाद्या जाती विषय नसून स्त्री जातीवर होणारा अमानुष बलात्कार या घटना मानवी राक्षसी प्रवृत्ती विरुद्ध आहे पिढीत बालिकेवर झालेल्या अत्याचाराला काही समाजकंटकांनी पैशाच्या जोरावर प्रकरण दाबण्याचा व कुटुंबास मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत पीडित बालिकेला लवकरच न्याय मिळावा व गुन्हेगाराला कडक शासन मीळण्यासाठी व पीडित मुलीचे पालक यांना संरक्षण आर्थिक पाठबळ मिळावे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशा प्रकारची दुर्घटना घडू नये याची राज्य शासनाद्वारे दखल घेण्यात यावी याकरिता आम्ही निवेदनाद्वारे मागणी करीत आहोत तरी आमच्या बालिकेला न्याय मिळवून द्यावा असेही नमूद करण्यात आले असून यांच्या प्रति लिपि माननीय पंतप्रधान भारत सरकार महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ऊर्जामंत्री पालकमंत्री वासिम जिल्हाधिकारी वाशिम यांना देण्यात आले आहेत त्यावेळी नगरसेवक किशोर महाकाळ ओम काटेकर अनिकेत शेटे जयदेव काटेकोर येगेश क्षीरसागर ज्ञानेश्वर काटेकर उमेश काटेकर प्रकाश महाकाळ राहूल चोपडे राजेंद्र जींतुरकर पंकज महाकाळ राम आढाव शुभम काटेकर विलास आढाव तुशार आढाव शाम काटेकर सुनील महाकाळ आश्विन शिरसागर अभीशेक आढाव दीपक काटेकर गणेश आढाव आदी समाज बांधव उपस्तीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358