MH News Marathi
Hindi News Portal

आई वडिलांची सेवा करून गुरुजनांचा आदर बाळगावा-   गोपाल राऊत

मालेगाव:-  छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणा व त्यांचा आदर्श व आई-वडिलांची सेवा करून गुरुजनांचा आदर बाळगावा असे प्रतिपादन पंचायत समितीचे माजी सदस्य गोपाल पाटील राऊत यांनी केले येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते

     स्थानिक रामराव झनक विद्यालयाच्या वतीने  शिवाजी महाराज यांची 397 वी जयंती साजरी करण्यात आली यानिमित्त आयोजित कार्यक्रमात गोपाल पाटील राउत यांची मुख्य उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थनीा प्रा  पवार हे होते तसेच कार्यक्रमाला प्रा नंदकिशोर गायकवाड प्रा भीमराव जांभरुणकर यांची उपस्थिती होती सुरुवातीला प्रमुख अतिथी गोपाल पाटील राऊत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख  मार्गदर्शन म्हणून गोपाल पाटील राऊत यांनी शिवाजी महाराजांचे विचारात आचरणात आणावे व तशी कृती करावी छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श व्यक्तिमत्व  असल्याने  त्यांचा आदर्श घ्यावा असे सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना स्वतः व्यसनमुक्त राहून समाज व्यसनमुक्त करावा व त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवकांनी पुढे आले पाहिजे असे सांगून विद्यार्थ्यांनी अभ्यास वृत्ती बाळगून  आईवडिलांची सेवा करावी व गुरुजनांचा आदर बाळगावा असे सांगितले तसेच गोपाल पाटील राऊत यांनी आपल्या अनुभवाची शिदोरी विद्यार्थ्यांसमोर मांडून यशस्वी जीवनाची वाटचाल कशी करावी  याचे मूलमंत्र त्यांनी  आपल्या मार्गदर्शनीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना दिला तर यशस्वी होण्यासाठी उद्योग धंदा व्यवसाय व्यापार इत्यादीकडे लक्ष देऊन आपला जीवन मार्ग निवडण्याचा सल्लाही त्यांनी दिला तब्बल दोन तासांच्या भाषणांमधून त्यांनी विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण प्रबोधन केले . या कार्यक्रमाचे अवचीत्त साधून  प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना गोपाल पाटील राऊत यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले प्रा  नंदकिशोर गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती..

MH NEWS MARATHI

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358