मालेगाव:- तालुक्यात स्मार्ट ग्राम योजनेमध्ये झालेल्या चुकीच्या पुरस्कार निवडीबद्दल न्याय न मिळाल्यास येणाऱ्या 12 फेब्रुवारी पासून गावकऱ्यांचे मालेगाव पंचायत समितीसमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा ढोरखेडा येथील सरपंच सुनीता मिटकरी यांनी दिला आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायत ढोरखेडा यांनी स्मार्ट ग्राम योजनेमध्ये भाग घेतला होता परंतु तपासणी अधिकारी असलेले मानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या ग्रामपंचायतीचे स्मार्ट ग्राम योजनेमध्ये भाग न घेतलेल्या ग्रामपंचायत एकांबा ग्रामपंचायत ची तपासणी करून चुकीच्या पद्धतीने निवड केली आहे शासनाची दिशाभूल केली आहे असे या निवेदनामध्ये नमूद केले आहे
तरी हा ढोरखेडा येथील सरपंच व तसेच गावकरी यांच्यावर अन्याय झाला या प्रकरणी योग्य ती चौकशी करून दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ढोरखेड्याच्या सरपंचा सुनिता दत्तात्रय मिटकरी यांनी शासन दरबारी केली केली आहे त्याचा पोच पावत्या माननीय पंकजाताई मुंडे ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र राज्य रिसोड विधानसभा आमदार अमित झनक तसेच जिल्हाधिकारी वाशिम गट विकास अधिकारी पं. स. मालेगाव यांना दिले आहेत.