MH News Marathi
Hindi News Portal

नाफेड तुर खरेदी साठी स्वाभीमानी शेतकरी संघटने चे निवेदन

मालेगाव: – येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी तहसीलदारांना नाफेड तुर खरेदी साठी निवेदन दिले आहे
त्यानी त्यात असे नमूद केले आहे की नाफेड द्वारा तुर खरेदी साठी ऑनलाईन प्रक्रीया दोन महिन्यापासून सुरू करूनही अद्यापही कुठल्याच प्रकारे तुर खरेदी नाफेड द्वारा सुरू करण्यात आली नाही यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत शेती पिकवावी लागते परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी हा आपला माल कमी भावात त्यांना विकावा लागत आहे हे दुर्दैव आहे की घरामध्ये तुरी चे पीक येऊन पडले आहे कारन नाफेड खरेदी केंद्र चालू झाले नाही नाफेड खरेदी दोन दिवसांत सुरू न झाल्यास आम्ही स्वाभीमानी शेतकरी संघटने तर्फे आक्रमक आंदोलन करू यात जिम्मेदार प्रशासन राहील असे नमूद करण्यात आले आहे या निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा पाठविण्यात आली आहे यामुळे नाफेड तूर खरेदी कधी सुरु होणार याकडे सर्व तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे ही खरेदी दोन दिवसांत नाफेड द्वारा तुर तुर खरेदी न झाल्यास स्वाभिमानी संघटना आक्रमक आंदोलन करणार असल्याचे त्यानी सांगितले यावेळी जिकलहद्यक्ष दामोदर इंगोले जिल्हा , ओमप्रकाश गायकवाड़ जिल्हा संघटक , राजुभाऊ गायकवाड़ जिल्हा सचिव स्वभिमानी पक्ष , अजय इंगोले शहर अध्यक आदि हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358